मुंबई : बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार शनिवारी एकत्र रॅंपवर दिसले. बऱ्याच काळानंतर अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिंन्हा, अनिल कपूर एकाच मंचावरा दिसले.
याच शोमध्ये अभिषेक बच्चननं आई जया बच्चनसोबत तर सोनाक्षी सिन्हा हिनं वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत रॅंप वॉक केलं. जावेद अख्तर यांनी मुलगा फरहान अख्तरसोबत रॅप वॉक केलं.
या सर्वांनंतर बॉलिवूडच्या बादशहांनी एन्ट्री घेतली. अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चनसोबत तर, अनिल कपूर यांनी सोनम कपूरसोबत रॅंप वॉक केलं. निमित्त होतं शबाना आजमींनी आयोजित केलेल्या 'मिजवा-द-लिगेसी' या फॅशन शोचं. शबाना आजमी यांनी आयोजित केलेल्या फॅशन शोचं हे पाचवं वर्ष होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.