बिग बींच्या दिवाळी पार्टीत सलमानची गैरहजेरी!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं.... तर दुसरीकडे अनिल कपूरनेही दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं...त्यामुळेच अऩेक बॉलिवूडमधील नामी सितारे एकापाठोपाठ एक या दोन्ही पार्टींमध्ये दिसले.

Updated: Nov 12, 2015, 05:27 PM IST
बिग बींच्या दिवाळी पार्टीत सलमानची गैरहजेरी! title=

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं.... तर दुसरीकडे अनिल कपूरनेही दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं...त्यामुळेच अऩेक बॉलिवूडमधील नामी सितारे एकापाठोपाठ एक या दोन्ही पार्टींमध्ये दिसले.

बिग बींच्या पार्टीमध्ये वरुण धवन, डेविड धवन, मिका, हेमामालिनी, इशा देओल, शबाना आज्मी, जावेद जाफरी, मुकेश अंबानी, रणवीर सिंग, दीपिका पादूकोन, शाहरुख खानसह अनेक बडे बॉलिवूड कलाकार आले होते. शाहिद कपूरही आपली पत्नी मीरा समवेत या पार्टीत सहभागी झाला होता. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन पार्टीचे होस्ट होते.


बी टाऊन

तर दुसरीकडे अनिल कपूरच्या पार्टीतही रणबीर कपूर, जॅकलीन फर्नांडिस, कतरिना कैफ, असिन, स्वरा भास्कर, आदित्य रॉय कपूर यांच्यासह अनेक मानी चेहरे सहभागी झाले होते. 

अनिलच्या पार्टीचं वैशिष्ट्य म्हणजे 'दबंग' सलमान खान हा पहाटेपर्यंत या पार्टीत सहभागी झाला होता. त्यामुळे बिग बींच्या पार्टीला सलमानने दांडी मारल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत... ऐश्वर्यामुळे सलमानने  बिग बींपासून दुरावा ठेवलाय की काय? असा प्रश्न अजूनही पडलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.