मुंबई : गायक अरिजीत सिंग नुकताच चर्चेत आला तो त्याच्या एका सोशल वेबसाईटवर केलेल्या पोस्टमुळे... सलमान खानची माफी मागत आपलं गाणं आगामी 'सुल्तान' या चित्रपटातून न हटविण्याची मागणी त्यानं या पोस्टमध्ये केली होती. त्यावर, सलमाननं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे आता हा गायक खुद्द सलमानच्या घरी जाऊन त्याची माफी मागणार आहे.
'सुल्तान' या सिनेमातून आपलं गाणं हटवण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यासाठी अरिजित आता सलमानच्या घरी जाऊन सलमानची आणि त्याच्या वडिलांची भेट घेणार आहे.
यावर, सलमानच्या जवळचा मित्र निखिल त्रिवेदी यानं ट्विट करून 'सलमाननं आपल्या चित्रपटातून अरिजितचं गाणं हटवलेलं नाही' असं म्हटलंय. सलमान इतका छोटाही नाही... त्यानं अरिजितच्या गाण्यावर शूटिंग पूर्ण केलीय मग तो हे गाणं चित्रपटातून का काढून टाकेल? असंही निखिलनं म्हटलंय.