अनुराग कश्यपची बॉलिवूडमधून एक्झिट

'बॉम्बे वेलवेट'च्या अपयशानंतर नाराज झालेल्या निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप बॉलिवूडमधून एक्झिट घेणार आहे. अनुराग कश्यप लवकरच भारत सोडून पॅरिसमध्ये स्थायिक होणार आहे. 

Updated: May 19, 2015, 02:03 PM IST
अनुराग कश्यपची बॉलिवूडमधून एक्झिट title=

मुंबई: 'बॉम्बे वेलवेट'च्या अपयशानंतर नाराज झालेल्या निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप बॉलिवूडमधून एक्झिट घेणार आहे. अनुराग कश्यप लवकरच भारत सोडून पॅरिसमध्ये स्थायिक होणार आहे. 

अनुराग याच महिन्यात पॅरिसला रहाण्यासाठी जाणार आहे. मात्र 'फॅन्टम फिल्मस्'मध्ये असलेली भागिदारी तो कायम ठेवणार आहे. तसेच 'अनुराग कश्यप फिल्मस् प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचा कारभार गीता मोंगा पाहणार आहेत. 

अनुरागने सांगितले की, 'मला नव्याने सुरूवात करायची आहे. मला अशा ठिकाणी जायचं जिथे चित्रपटांवर लोकांची फारशी बंधनं नसतील. मला स्वतःला पुढे न्यायचं आहे आणि भारतात राहून मी स्वतःला पुढे नेऊ शकणार नाही.'

अनुरागने बॉलिवू़डमध्ये 'ब्लॅक फ्रायडे', 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'अगली' आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'बॉम्बे वेल्वेट' यासारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.