मुंबई : सारा जेन्स, संध्या म्रिदुल, अनुष्का मनचंदा, राजश्री देशपांडे अमृत मघेरा आणि तनिशा चॅटर्जी या स्टार मंडळींचा 'अॅंग्री इंडियन गॉडेसेस' हा सिनेमा. कसा आहे 'अॅंग्री इंडियन गॉडेसेस', हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? आधी या प्रश्नांची उत्तर सिनेमा पाहील्यानंतर मिळतील.
कथानक
आठ स्रियांभवती फिरणारा 'अॅंग्री इंडियन गॉडेसेस' हा सिनेमा आहे. फ्रिडा आपल्या सगळ्या मैत्रिणींना गोव्याला तिच्या घरी आमंत्रित करते. निमित्त आहे फ्रिडाचं लग्न. या सगळ्या जणी तिच्या घरी पोहचतात, एकत्र आल्यानंतर या सगळ्य़ा पुन्हा कॉलेजच्या तरुणींसारख्या आयुष्य एंजॉय करतात. पण हळूहळू एक एक धागा सुटत जातो.
बाहेरुन अत्यंत खूश दिसणाऱ्या या मुलींच्या मनात भरपूर काही दबलेलं असतं. प्रत्येकीच्या आयुष्यात काहीतरी मिसिंग आहे. इन फॅक्ट फ्रिडाच्या लग्नामागेही एक वेगळीच कहाणी आहे. या सगळ्या मैत्रिणी एकत्र येउन मजा मस्ती तर करतात पण त्याच बरोबर आपले सुख दुखही एकमेकींसोबत शेअर करतात.
एका स्त्री कधीही कितीही स्वातंत्र असली तरी ती स्वत:चं आय़ुष्य स्वत:सोबतच इतरांसाठीही जगत असते. अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा आहे. इनशोर्ट या फिल्मला आपण एक फिमेल बड्डी फिल्म म्हणू शकतो.
सिनेमाची वेगळी स्टाईल्स
पॅन नलिननं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सिनेमाची सुरुवात त्यानं खूप वेगळ्या स्टाइलनं केली आहे.. ज्या पद्धतिनं कॅनरा वर्क करण्यात आलाय त्यासाठी सिनेमाटोग्राफर स्वप्नील सोनावणेला हॅट्स ऑफ आहे. सिनेमाला चांगलं स्क्रिनप्ले लाभल्यामुळे दिग्दर्शकानं त्याचा पूर्ण फायदा सिनेमासाठी करुन घेतलाय एवढ नक्की.
घर आणि मुलं संभालण्यापलिकडे प्रत्येक स्त्रीचं आयुष्य़ात एक ध्येय असतं, त्या गोष्टीला खूप सुंदर पद्धतीनं यात मांडण्यात आलंय. याचं यश खरंतर सिनेमाच्या दिग्दर्शकाला द्यालाच हवं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.