राखीचा मुका... आणि डॉक्टरच्या थोबाडीत!

भर कार्यक्रमात आयटम गर्ल राखी सावंतचा मुका घेणाऱ्या मिकानं आता भर कार्यक्रमात आणखी एक पराक्रम केलाय. 

Updated: Apr 13, 2015, 02:16 PM IST
राखीचा मुका... आणि डॉक्टरच्या थोबाडीत! title=

नवी दिल्ली : भर कार्यक्रमात आयटम गर्ल राखी सावंतचा मुका घेणाऱ्या मिकानं आता भर कार्यक्रमात आणखी एक पराक्रम केलाय. 

एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एका डॉक्टरला मिकानं जोरदार थोबाडात ठेऊन दिलीय. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे प्रकरणाची तक्रार नोंदवली गेलीय. जखमी करणं आणि चुकीच्या पद्धतीनं रोखण्याचा प्रयत्न करणं असे आरोप इंद्रपुरी पोलीसांनी मिकावर लावले आहेत. या घटनेचा व्हिडिओही काही वेबसाईटवर दिसतोय. 

पीडित डॉक्टरचं नाव श्रीकांत आहे. श्रीकांत हा आंबेडकर हॉस्पीटलमध्ये नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून काम करतात. या घटनेत त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय. इंद्रपूरीमधल्या दिल्ली पूसा इन्स्टिट्यूट मेळावा मैदानात आयोजित तीन दिवसीय संम्मेलनात रविवारी सायंकाळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रम प्रस्तुत करताना मीकानं काही कारणानं दर्शकांमधील काही लोकांना मंचावर पाचारण केलं होतं. याच दरम्यान डॉक्टरानं केलेल्या काही वक्तव्यावर नाराज झालेल्या मिकानं त्याच्या जोरदार थोबाडीत ठेऊन दिली. त्यानंतर त्याला बाऊन्सरकडे सोपवण्यात आलं. 

घटनेनंतर पीडित डॉक्टरच्या आप्तेष्टांनी कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला. परंतु, पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप करत मिकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर गायक मिकावर तक्रार नोंदवण्यात आली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.