'बिग बीं'च्या मराठमोळ्या शुभेच्छांनी चाहते खूश

बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या सर्व मराठी चाहत्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या शुभेच्छा मराठीत आहेत. “नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असू दे आणि तुमचे आयुष्य मंगलदायी होवो” असं त्यांनी आपल्या फोटोवर लिहून ट्विटरवर पोस्ट केलं आहे.

Updated: Aug 7, 2016, 03:32 PM IST
'बिग बीं'च्या मराठमोळ्या शुभेच्छांनी चाहते खूश title=

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या सर्व मराठी चाहत्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या शुभेच्छा मराठीत आहेत. “नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असू दे आणि तुमचे आयुष्य मंगलदायी होवो” असं त्यांनी आपल्या फोटोवर लिहून ट्विटरवर पोस्ट केलं आहे.

नागपंचमी हा सण मुख्यतः महाराष्ट्रात साजरा केला जातो आणि महाराष्ट्र ही अमिताभ यांची कर्मभूमी आहे. त्यामुळे मराठीत शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या मराठी चाहत्यांना खूश केलं आहे.

खरंतर हिंदी भाषेवरील प्रभुत्त्व ही बिग बींची खासियत आहे. पण आपली संपूर्ण कारकीर्द महाराष्ट्रात घालवल्याने त्यांना थोडंफार मराठीही बोलता येतं. त्यामुळे संधी मिळेल तिथे बिग बी मराठीतून व्यक्त होतात.