महानायक अमिताभ बच्चन ट्विटरवर ठरले 'बिग बी'

महानायक अमिताभ बच्चन यांची जादू सोशल नेटवर्किंग साईटवरही कायम आहे. ट्विटरवर सलमान, शाहरुख आणि आमिर खानला मागे टाकत त्यांनी अव्वल क्रमांक पटकावलाय.

Updated: Jan 24, 2016, 10:40 PM IST
महानायक अमिताभ बच्चन ट्विटरवर ठरले 'बिग बी' title=

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांची जादू सोशल नेटवर्किंग साईटवरही कायम आहे. ट्विटरवर सलमान, शाहरुख आणि आमिर खानला मागे टाकत त्यांनी अव्वल क्रमांक पटकावलाय.

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या 1 कोटी 90 लाख झाली आहे. अमिताभ 2010 मध्ये ट्विटरवर आले. आणि त्यानंतर त्यांच्या फलोअर्सची संख्या कमालीची वाढली. तिन्ही खानसना मागे टाकत त्यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय.