मुंबई : मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईमचा शो सक्तीचा करण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी घेतला. त्याचं मराठी सिनेइंडस्ट्रीतर्फे स्वागतही करण्यात आले. मात्र बॉलिवूडकरांच्या यामुळे पोटात दुखू लागलं आहे. शोभा डे याच्यानंतर आता आमिर खानने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारकारला कायदा करून अशी सक्ती करण्याची गरज काय होती? असा प्रश्न आमिरने उपस्थित केला आहे. मराठीमध्ये चांगले सिनेमे तयार होतात. मी मराठी आणि प्रादेशिक भाषांच्या सिनेमांचा आदर करतो. मात्र सिनेमा प्राईम टाईमला दाखवण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे की नाही हे मला माहीत नाही, असं मत आमिरने व्यक्त केले आहे
याआधी शोभा डे यांच्यासह अनेकांनी या निर्णयावर आक्षेप घेतला होता. तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.