पाहा व्हिडिओ: आता आलिया बनली जीनियस ऑफ द इअर

स्टुडेंट ऑफ द इयर, हाइवे आणि टू स्टेटस सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी आलिया भट्टला घेऊन एआयबीने एक जबरदस्त व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशिल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत दाखविण्यात की आलिया डम होती आणि कशी नंबर वन झाली. 

Updated: Aug 25, 2014, 07:56 PM IST
पाहा व्हिडिओ: आता आलिया बनली जीनियस ऑफ द इअर  title=

मुंबई: स्टुडेंट ऑफ द इयर, हाइवे आणि टू स्टेटस सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी आलिया भट्टला घेऊन एआयबीने एक जबरदस्त व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशिल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत दाखविण्यात की आलिया डम होती आणि कशी नंबर वन झाली. 

एआयबीने करन जोहर याच्या ‘कॉफी विथ करन’ च्या एक एपिसोडमध्ये आलियाने काही प्रश्नांची चुकीचे उत्तरं दिली होती. त्यामुळे आलियावर सोशल मीडियामध्ये खूप जोक्स निर्माण झाले होते. त्यालाच सेंटर पॉइंट घेऊन हा व्हिडिओ बनिविण्यात आला आहे. 

या व्हिडिओ आलिया सोबत अनेक ताऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच एआयबीची टीमही या व्हिडिओचा हिस्सा आहे. पहिल्यांदा हा व्हिडिओ आलियाची इमेज मेकिंगचा प्रयत्न वाटतो पण व्हिडिओ संपतो तो पर्यंत आलिया पुन्हा आपल्या जुन्या रुपात दिसून लागते. 

काय होतं प्रकरण आणि का बनले आलियावर जोक्स 
काही काळापासून सोशल मीडियावर अभिनेत्री आलिया भट्टच्या जीके (जनरल नॉलेज) वर काही जोक्स सुरू होते. यावर आलियाने सांगितले की या जोक्समुळे ती नाराज होत नव्हती पण तिला आनंद होत होता. 
कॉफी विथ करनमध्ये आलियाला भारताचे राष्ट्रपती कोण असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी तिने पृथ्वीराज चव्हाण असं उत्तर दिलं. यावेळी वरूण धवनने मनमोहन सिंग असं उत्तर दिलं होतं. केवळ सिद्धार्थ मल्होत्रा याने प्रणव मुखर्जी हे उत्तर दिलं होते.  

यानंतर आलियाच्या सामान्य ज्ञानावर सोशल मीडियावर जोक्स तयार झाले. 

पाहा हा मजेदार व्हिडिओ  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.