नवी दिल्ली : 'कॉमेडी नाईटस् विथ कपिल'च्या 'पलक'ला अर्थात किकू शारदा याला अटक झाल्यानंतर याच कार्यक्रमातील 'दादी'ला अर्थात अली असगर याच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु, अली अजगर याला मुंबई हायकोर्टानं एका आठवड्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय.
अली असगरला २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर आठवडाभरासाठी जामीन मंजूर झालाय. या दरम्यान त्याला हरियाणातकल्या कॅथल न्यायालयासमोर हजर व्हावं लागणार आहे.
अलीशिवाय आणखी आठ जणांविरुद्ध डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी धार्मिक भावना भडकावण्याचा गुन्हा दाखल केलाय. याच गुन्ह्यासाठी सध्या किकू शारदा याला अटक करण्यात आलीय.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टीव्हीवर आलेल्या एका कार्यक्रमानंतर राम रहीमच्या अनुयायांनी कॅथलमध्ये या कलाकारांविरोधात गुन्हा दाखल केला होता.