अक्षयने शेअर केली असिन-राहुलच्या लग्नाची पत्रिका

बॉलीवूड अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्मा यांचा लवकरच विवाह होतोय. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र अक्षय कुमारला लग्नाचे निमंत्रण मिळालेय बरं का.

Updated: Jan 11, 2016, 03:06 PM IST
अक्षयने शेअर केली असिन-राहुलच्या लग्नाची पत्रिका title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्मा यांचा लवकरच विवाह होतोय. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र अक्षय कुमारला लग्नाचे निमंत्रण मिळालेय बरं का.

अक्षयने लग्नाच्या पत्रिकेचा फोटोही ट्विटरवर अपलोड केलाय. तसेच असिन आणि राहुल यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्यात. 

अक्षय असिन आणि राहुल दोघांचाही जवळचा मित्र असल्याने त्याला पहिली लग्न पत्रिका देण्यात आलीय. खिलाडी ७८६ आणि हाउसफुल्ल २ सांरख्या चित्रपटात अक्षयने असिनसोबत काम केलेय.