Oh no! रिंकू आणि आकाश यांच्यात ऑल वेल नाही?

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने मराठी चित्रपचसृष्टीत नवा इतिहास रचला. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा नंबर वन चित्रपट ठरलाय.

Updated: Jun 18, 2016, 10:12 AM IST
Oh no! रिंकू आणि आकाश यांच्यात ऑल वेल नाही? title=

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने मराठी चित्रपचसृष्टीत नवा इतिहास रचला. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा नंबर वन चित्रपट ठरलाय.

सैराटने बॉक्स ऑफिसवर 85 कोटीहून अधिक कमाई केली असून 100 कोटींच्या दिशेने याची घोडदौड वेगाने सुरु आहे. सैराटला मिळालेल्या अमाप प्रसिद्धीमुळे मुख्य भूमिका करणारे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर अवघ्या एका रात्रीत स्टार बनलेत.

शूटिंगच्या आधी या दोघांची एकमेकांशी ओळख नव्हती. मात्र शूटिंगदरम्यान त्यांची चांगली ओळख झाली. चित्रपट रिलीज होण्याआधी प्रोमोशनल अॅक्टिव्हिटीमध्ये हे दोघं एकत्र दिसले होते.

मात्र डीएनच्या वृत्तानुसार, या दोघांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा आहे. एकमेकांचे चांगले मित्र असणारे रिंकू आणि आकाश एकमेकांना टाळत असल्याचे बोलले जातेय. दरम्यान, त्यांच्यातील कटुतेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र दोघेही प्रमोशनल इव्हेंटमध्ये मात्र एकत्र दिसतात.