पाठकबाईंचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत पाठकबाईंची भूमिका साकारणारी अक्षया देवधर हिचा इन्स्टाग्रामवरील फोटो सध्या चांगलाच चर्चेत आलाय. विशेष म्हणजे या फोटोसोबतची कॅप्शन चर्चेचा विषय ठरलीये.

Updated: Mar 23, 2017, 03:54 PM IST
पाठकबाईंचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत title=

मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत पाठकबाईंची भूमिका साकारणारी अक्षया देवधर हिचा इन्स्टाग्रामवरील फोटो सध्या चांगलाच चर्चेत आलाय. विशेष म्हणजे या फोटोसोबतची कॅप्शन चर्चेचा विषय ठरलीये.

अक्षयाने का रे दुरावा फेम सुयश टिळक सोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना Missing u.. ! @suyashtlk Love असं म्हटलंय. त्यामुळे पाठकबाईंचा जीव राणादा नव्हे तर सुयशमध्ये गुंतलाय की काय अशा चर्चा सुरु आहेत. 

पाठकबाई आणि राणादा यांच्या निरागम प्रेमाची कहाणी म्हणजेच तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच हिट ठरतेय. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद या मालिकेस मिळतोय. 

या मालिकेची चर्चा तर सोशल मीडियावर सुरु असतेच मात्र त्याचबरोबर आता पाठकबाईंच्या या फोटोची चर्चाही जोरदार सुरु झालीये.

 

Missing u.. ! @suyashtlk Love❤️

A post shared by Akshaya Deodhar (@akshayaddr) on