बॉलिवूडमध्ये एंट्री करायला दिलीप कुमार यांची नात सज्ज

बॉलिवूडचे लिंजेडरी अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची नात साएशा अजय देवगणच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करतेय. अजयच्या ‘शिवाय’ या फिल्ममध्ये ती असेल.

Updated: Oct 10, 2014, 08:36 AM IST
बॉलिवूडमध्ये एंट्री करायला दिलीप कुमार यांची नात सज्ज title=

मुंबई: बॉलिवूडचे लिंजेडरी अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची नात साएशा अजय देवगणच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करतेय. अजयच्या ‘शिवाय’ या फिल्ममध्ये ती असेल.

साएशा सायरा बानो यांचे बंधु शाहीन अहमद यांची नात आणि अभिनेता सुमित सहगलची मुलगी आहे. शिवाय या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्माता दोन्ही अजय देवगणनं केलंय. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचं या चित्रपटावर लक्ष होतं. मात्र अजयला यासाठी एक नवा चेहरा हवा होता. अनेक ऑडिशन्सनंतर अजयनं साएशाला निवडलं. 

साएशासाठी अजय सारख्या मोठ्या अभिनेत्यासोबत मोठ्या पडद्यावर डेब्यू करणं म्हणजे खूप चांगली संधी आहे. साएशाचे वडील सुमीत ९०च्या दशकातील अभिनेता होते. ज्यांनी ‘सौदा’, ‘स्वर्ग जैसा घर’ आणि ‘अपना देश पराये लोग’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.