बच्चन बनल्यानंतर पहिल्यांदाच ऐश करणार लिपलॉक!

करण जोहर प्रोडक्शनमध्ये तयार होणाऱ्या ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमातून ऐश्वर्या राय पुन्हा एकदा सिनेमांत आपलं ‘कमबॅक’ करणार आहे हे तर आता निश्चित झालंय. या सिनेमात तिच्यासोबत आहे रणबीर कपूर... 

Updated: Dec 7, 2014, 10:48 PM IST
बच्चन बनल्यानंतर पहिल्यांदाच ऐश करणार लिपलॉक! title=

मुंबई : करण जोहर प्रोडक्शनमध्ये तयार होणाऱ्या ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमातून ऐश्वर्या राय पुन्हा एकदा सिनेमांत आपलं ‘कमबॅक’ करणार आहे हे तर आता निश्चित झालंय. या सिनेमात तिच्यासोबत आहे रणबीर कपूर... 

पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि ऐश्वर्या एकच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. करण जोहर दिग्दर्शित या सिनेमात ऐश्वर्या आणि रणबीरसोबतच अनुष्का शर्मादेखील दिसेल. 

मिळालेल्या माहितीनुसार, करणच्या या सिनेमात रणबीर आणि ऐश्वर्याचा एक लिपलॉक सीनदेखील शूट केला जाणार आहे. सिनेमाचं कथानसक एका इंटेन्स लव्ह स्टोरीवर आधारीत असल्या कारणानं या सिनेमात हा सीन महत्त्वाचा ठरू शकतो. 

दरम्यान, रणबीर आणि ऐश्वर्या यांनी सिल्ह्वर स्क्रिनवर इंटिमेट होणार किंवा नाही हे पक्कं नसलं तरी रणबीरसोबत काम करण्यास ऐश्वर्या खूपच उत्साहीत आहे. म्हणूनचक, अनेक ठिकाणी ती रणबीरचं कौतुक करताना दिसतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.