मुंबई : 'ख्वाहिश' आणि 'मर्डर' या सिनेमांमुळं लोकप्रियता मिळालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या बोल्ड अंदाजामुळे प्रेक्षकांच्या मनात खुप काळासाठी घर करून होती. परंतु जसा जसा वेळ गेला तिच्या करिअरचा उतरती कळा लागली. अगली और पगली, मान गए मुगल-ए-आजम, हिस्स आणि किस्मत लव पैसा यांसारखे तिचे एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत गेले.
तिचं स्वत:चं स्वयंवर देखील प्रेक्षकांना इतकं भावलं नाही. परंतु विश्वास ठेवावाच लागेल हीच पोष्टर गर्ल एका धमाकेदार ए्रंट्रीत पुन्हा पडदयावर दिसणार आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात तिचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'डर्टी पॉलिटिक्स' असं या सिनेमाचं नाव असणार आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिग्दर्शक के.सी.बोकाडीयांच्या या सिनेमात मल्लिका तिच्या करिअर मधला सगळ्यात बोल्ड रोल करणार आहे. या रोल साठी प्रेक्षक खूपच आतुरलेले असणार आहेत. कारण ती फक्त सेक्सी दिसणारच नाही तर ती बोलणारा प्रत्येक डायलॉग हे प्रेक्षकांना दातांखाली ओठ दाबायला लावणारा असणार आहे.
सुत्रांकडून अशी देखील माहिती आहे की 'डर्टी पॉलिटिक्स' हा सिनेमा २०११च्या भंवरी देवी सेक्स स्कॅंडलवर आधारीत आहे. आता मल्लिका ही भंवरी देवी कशी निभावेल हे तर आपण चित्रपटाच्या पोस्टर वरून नक्कीच कल्पना करू शकतो
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.