'कान'च्या रेड कार्पेटवर सहज-सुंदर 'ऐश्वर्य'!

भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा कान महोत्सवाच्या रेड कार्पेटवर दाखल झालीय. 

Updated: May 14, 2016, 02:42 PM IST
'कान'च्या रेड कार्पेटवर सहज-सुंदर 'ऐश्वर्य'! title=

कान : भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा कान महोत्सवाच्या रेड कार्पेटवर दाखल झालीय. 

कुवैतचा डिझायनर अली युनुसनं  डिझाइन केलेल्या शॅम्पेन रंगाच्या उठावदार गाऊनमध्ये ऐश्वर्यसंपन्न ऐश्वर्या आणखीनच खुलून दिसत होती. 

ऐश्वर्या २००२ सालापासून सलग कान फिल्मोत्सवात सहभागी होतेय. ४२ वर्षीय ऐश्वर्याचं कान महोत्सवात सहभागी होऊन भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं हे सलग १५ वं वर्ष आहे. 

कानमध्ये कॉस्मेटिक ब्रँन्ड लोरियलची ब्रँन्ड अॅम्बेसेडर म्हणून ऐश्वर्या सहभागी झालीय. ऐश्वर्या ६० व्या कान फिल्मोत्सवात 'मा लूत' या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी जात असतानाचे हे फोटो आहेत. 

आपली मुलगी आराध्या आणि आई वृंदा राय यांच्योसोबत ऐश्वर्या कान महोत्सवासाठी दाखल झालीय.