पाहा, ऐश्वर्या - अभिषेकच्या चिमुकल्या आराध्याचा लेटेस्ट फोटो

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिचा एक नवा फोटो समोर आलाय. 

Updated: Sep 25, 2015, 03:32 PM IST
पाहा, ऐश्वर्या - अभिषेकच्या चिमुकल्या आराध्याचा लेटेस्ट फोटो title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिचा एक नवा फोटो समोर आलाय. 

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आराध्या आणि आपल्या आई-वडिलांसोबत मुंबईच्या जीएसबी गणपतीचं दर्शन घ्यायला दाखल झाली होती. याच वेळचा हा फोटो आहे.

यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या चांगल्याच आनंदी दिसत होत्या. मंदिरात पूजा सुरू असताना सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होती ती आराध्या... 

आता, आराध्या जवळपास 4 वर्षांची झालीय... 5 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर लवकरच, ऐश्वर्या संजय गुप्ता यांच्या 'जज्बा' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. 

यापूर्वी ती 2010 साली आलेल्या गुजारिश या सिनेमात ऋतिक रोशनसोबत दिसली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.