अभिनेत्री आलिया -रणवीर एकत्र, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग लवकरच एकत्र दिसणार आहेत.

Updated: Mar 15, 2016, 05:18 PM IST
अभिनेत्री आलिया -रणवीर एकत्र, सोशल मीडियावर फोटो व्हायरल title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग लवकरच एकत्र दिसणार आहेत. मीडियाच्या रिपोर्टनुसार याचा खुलासा झालेला नाही. मात्र, दोघे कोणत्या सिनेमात असतील त्याची माहिती मिळू शकलेली नाही. परंतु सोशल मीडियावर दोघांना फोटो व्हायरल होत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार आलिया टॅक्सी ड्रायव्हरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर रणवीर एक सामान्य मुलाच्या अवतारात दिसत आहे. त्याच्या केसांना तेलाने चांगलेच चोपलेले दिसत आहे. तर त्याच्या खांद्याला एक बॅगही लटकविलेली आहे.

दुसऱ्या एका फोटोत आलिया गडद भूरे रंगाची साडीत पाहायला मिळते आणि रणवीर चित्ताच्या प्रिंटमधील जॅकेटमध्ये दिसत आहे. चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. ही जोडी कोणत्या माध्यमातून पुढे येत आहेत, याचा मात्र खुलासा होत नाही. या दोघांमध्ये काय कास्ट केलेय याची उत्सुकता लागलेय.