अबरामनं केली पापा शाहरूखची सिग्नेचर पोज कॉपी, फोटो वायरल

मोठ्या पडद्यावर आपले दोन्ही हात पसरवून किंग खाननं एक रोमांसची सिग्नेचर पोज दिली. शाहरूखची पोज म्हणून आपण सगळेच ती ओळखतो. शाहरूखचा प्रत्येक फॅन त्याची कॉपी करतो. मात्र नुकतीच या पोजची कॉपी केलीय शाहरूखच्या लाडक्या अबरामने...

Updated: Aug 2, 2015, 08:50 AM IST
अबरामनं केली पापा शाहरूखची सिग्नेचर पोज कॉपी, फोटो वायरल title=
सौजन्य- डीएनए.कॉम

मुंबई: मोठ्या पडद्यावर आपले दोन्ही हात पसरवून किंग खाननं एक रोमांसची सिग्नेचर पोज दिली. शाहरूखची पोज म्हणून आपण सगळेच ती ओळखतो. शाहरूखचा प्रत्येक फॅन त्याची कॉपी करतो. मात्र नुकतीच या पोजची कॉपी केलीय शाहरूखच्या लाडक्या अबरामने...

अबराम आतापासूनच आपल्या वडिलांकडून रोमांस आणि अॅक्टिंगचे धडे घेतोय की, काय असा प्रश्न हा फोटो पाहून पडेल. शाहरूखनं नुकताच एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय. ज्यात अबराम शाहरूखसारखा दोन्ही हात पसरून उभा आहे. फोटो अपलोड करत शाहरूखनं ट्विट केलंय, 'काय करणार हे जनुकांमध्येच आहे. हात उचललाच जातो कधी प्रार्थनेसाठी कधी आलिंगणासाठी'!

आपण सर्वेच जाणतो शाहरूख एक चांगला पिता आहे. तो आपलं काम आणि कुटुंब दोन्हीसाठी वेळ काढतो. आपल्या मुलांच्या प्रत्येक महत्त्वाचे क्षण कॅमेऱ्यात टिपत ते शेअरही करतो. शाहरूखच्या गॅलरीतील हाच अबरामचा नवा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय. 

सध्या शाहरूख 'दिलवाले'चं शूटिंग संपवून आलाय. रोहित शेट्टीच्या या चित्रपटातून शाहरूख-काजोलची जोडी अनेक वर्षांनंतर एकत्र दिसणार आहे. यात शाहरूख-काजोल सोबतच वरूण धवन आणि कृति सेनन आहे. 'दिलवाले' शिवाय शाहरूखचे 'फॅन' आणि 'रईस' हे दोन चित्रपट येवू घातले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.