...म्हणून अभिषेक - ऐश्वर्यामध्ये होतायत वाद?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्यात... आता पुन्हा एकदा ऐश आणि अभिमध्ये मतभेद असल्याचं समोर येतंय. 

Updated: Mar 4, 2017, 04:30 PM IST
...म्हणून अभिषेक - ऐश्वर्यामध्ये होतायत वाद? title=

मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्यात... आता पुन्हा एकदा ऐश आणि अभिमध्ये मतभेद असल्याचं समोर येतंय. 

'अमर उजाला'नं दिलेल्या बातमीनुसार, या दोघांची मुलगी आराध्या हिच्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद आहे. आराध्यानंही चाइल्ड आर्टिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करायला हरकत नाही...त्यामुळे चिमुरड्या आराध्यालाही अभिनयाचा अनुभव मिळेल, असं अभिषेकचं मत आहे... 

परंतु, ऐश्वर्याचं मत मात्र अभिषेकच्या या मतापेक्षा खूप वेगळं आहे. आपल्या मुलीला नेहमीच लाईमलाईटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऐश्वर्याला हे मान्य नाही. त्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरू झालाय. 

या बातमीवर विश्वास ठेवणं जड जात असलं तरी बॉलिवूड वर्तुळात ऐश-अभिच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.