सलमानच्या सुटकेवर अभिजीत यांची तिखट प्रतिक्रिया

सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर हायकोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. या निकालानंतर सलमानच्या कुटुंबियांमध्ये आणि फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे तर अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील याबाबत आनंद व्यक्त केला आहे पण काही दिवसांपूर्वी हि़ट अँड रन प्रकरणावर वक्तव्य करुन वादात सापडलेले गायक अभिजीत भट्टाचार्या यांनी पुन्हा एकदा तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Jul 25, 2016, 01:42 PM IST
सलमानच्या सुटकेवर अभिजीत यांची तिखट प्रतिक्रिया title=

मुंबई : सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर हायकोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. या निकालानंतर सलमानच्या कुटुंबियांमध्ये आणि फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे तर अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील याबाबत आनंद व्यक्त केला आहे पण काही दिवसांपूर्वी हि़ट अँड रन प्रकरणावर वक्तव्य करुन वादात सापडलेले गायक अभिजीत भट्टाचार्या यांनी पुन्हा एकदा तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीतने म्हटलं आहे की, 'सलमान खान जेलमध्ये जावो, नरकात जावो किंवा स्वर्गात जावो मला काहीही घेणं देणं नाही. मी सलमान खानचा फॅन नाही आणि त्याचे सिनेमेही पाहत नाही. माझ्या एका ट्विटमुळे माझी प्रतिमा कमी झाली होती. सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान कोणीही असो मी कोणाचीच पर्वा नाही करत.'

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अभिजीतने म्हटलं की, 'सलमान खानची सूटका झाली याचा मला आनंद नाही आणि दुख:ही नाही. मला दुख: किंवा आनंद का होईल ?'