आमिरची कमाई घटली

असहिष्णुतेबाबत केलेलं वक्तव्य आमिर खानला चांगलंच भोवलेलं दिसतंय.

Updated: Feb 8, 2016, 04:22 PM IST
आमिरची कमाई घटली title=

मुंबई: असहिष्णुतेबाबत केलेलं वक्तव्य आमिर खानला चांगलंच भोवलेलं दिसतंय. कारण आता आमिर खानकडे एकही जाहिरात नाहीये. मागच्याच वर्षी 5 ते 7 कोटी रुपयांच्या जाहिराती असणारा आमिर आता कोणत्याही ब्रॅण्डची जाहिरात करत नाहीये. 

कोणत्याही ब्रॅण्डची जाहिरात हातात नसलेला आमिर हा सध्या बॉलीवूडमधला एकमेव खान आहे. पण आमिर खान जाहिरातींसाठी काही कंपनींच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

 

आमिर खानचं इ-कॉमर्स कंपनी स्नॅप डिल बरोबरचा करार संपला, पण स्नॅप डिलनं आमिर बरोबरचा करार वाढवायला नकार दिला. असहिष्णुतेबाबत आमिरनं केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद झाला होता. त्यामुळे स्नॅप डिलनं हा करार वाढवला नाही. 

तर मागच्याच महिन्यात पर्यटन मंत्रालयानं 'अतुल्य भारत' च्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडर पदावर आमिरऐवजी अमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्राची नियुक्ती केली.