'तमाशा'सहीत पाच मराठी सिनेमे मोठ्या पडद्यावर, तुमचा ऑप्शन कोणता?

आज बॉक्स ऑफिसवर सिनेरसिकांसाठी तब्बल सहा सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. यामुळे, रसिक प्रेक्षकांचा आठवडा मात्र फिल्मी झालाय, हे नक्की! 

Updated: Nov 27, 2015, 01:53 PM IST
'तमाशा'सहीत पाच मराठी सिनेमे मोठ्या पडद्यावर, तुमचा ऑप्शन कोणता? title=

मुंबई : आज बॉक्स ऑफिसवर सिनेरसिकांसाठी तब्बल सहा सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. यामुळे, रसिक प्रेक्षकांचा आठवडा मात्र फिल्मी झालाय, हे नक्की! 

बॉक्स ऑफिसवर आज तब्बल पाच मराठी आणि एक बिगबजेट हिंदी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झालाय. हिंदीत इम्तियाज अली दिग्दर्शित रणबीर - दिपिका स्टारर 'तमाशा' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. 'ये जवानी है दिवानी'नंतर पुन्हा एकदा रणबीर आणि दीपिका 'तमाशा' या सिनेमात एकत्र आल्यामुळे या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढलीय.

हा सिनेमा रणबीरच्या करियरच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण, रणबीरच्या मागच्या तीन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ल्यामुळे रणबीरच्या करियवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं. म्हणूनच रणबीरला 'तमाशा'कडून अपेक्षा आहेत.

तर मराठीत 'उर्फी', 'शाली', 'धनगर वाडा', 'महानायक', शिनेमा' असे तब्बल पाच मराठी सिनेमे एकाच दिवशी बॉक्स ऑफसवर दाखल झालेत. साहजिकच, त्यामुळे यामध्ये स्पर्धाही चांगलीच वाढलीय. या पाचही सिनेमांमध्ये कोणता सिनेमा बाजी मारेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.