हरभजन सिंग पुन्हा होणार विवाहबद्ध

नुकताच अभिनेत्री गीता बसराशी विवाहबंधनात अडकलेला भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग पुन्हा लग्न करतोय. आठवड्याभरापूर्वीच हे जोडपं विवाहबद्ध झालं. लवकरच ही नवविवाहित जोडी कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाईट विथ कपिल' या शोमध्ये दिसणार आहे. 

Updated: Nov 27, 2015, 11:28 AM IST
हरभजन सिंग पुन्हा होणार विवाहबद्ध title=

नवी दिल्ली : नुकताच अभिनेत्री गीता बसराशी विवाहबंधनात अडकलेला भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग पुन्हा लग्न करतोय. आठवड्याभरापूर्वीच हे जोडपं विवाहबद्ध झालं. लवकरच ही नवविवाहित जोडी कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाईट विथ कपिल' या शोमध्ये दिसणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कॉमेडी नाईट शोच्या सेटवर पुन्हा या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. तसेच मेहेंदीपासून ते रिसेप्शनपर्यंत सर्व विधी पुन्हा होणार असल्याचीही चर्चा आहे. हरभजन आणि गीताच्या या दुसऱ्या लग्नाला अनेक बॉलीवूड कलाकाराही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

हरभजन सिंग आणि कपिल शर्मा हे गेल्या काही वर्षांपासून चांगले मित्र आहेत. कपिल हरभजनच्या लग्नाला उपस्थित राहू शकला नव्हता. मात्र आता कपिल या शोद्वारे लग्नात सहभागी होणार आहे. कपिलचा शो म्हटल्यावर या लग्नसोहळ्यात विनोदाची खमंग फोडणी असणारच हे मात्र निश्चित. 

यापूर्वी, हरभजन आणि युवराज सिंग कपिलच्या शोमध्ये येऊन गेले होते. या एपिसोडमध्ये दोन्ही क्रिकेटपटूंनी काही खुलासे केले होते. तसेच सुरेश रैना, विराट कोहली, विरेंद्र सेहवाग आणि कपिल देव या आजामाजी क्रिकेटपटूंनीही शोमध्ये सहभाग घेतला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.