झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेबाबत ५ गोष्टी

झी मराठीवरील का रे दुरावा या मालिकेच्या जागी येत्या २८ मार्चपासून 'काहे दिया परदेस' ही मालिका सुरु होतेय. 

Updated: Mar 21, 2016, 03:41 PM IST
झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेबाबत ५ गोष्टी title=
सौजन्य - ट्विटर

मुंबई : झी मराठीवरील का रे दुरावा या मालिकेच्या जागी येत्या २८ मार्चपासून 'काहे दिया परदेस' ही मालिका सुरु होतेय. या मालिकेच्या प्रोमोजनाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. त्यामुळे या मालिकेबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. दोन संस्कृतींना जोडणारी अशी ही मालिका आहे. 

या मालिकेबाबतच्या ५ गोष्टी

१. आतापर्यंत हिंदी मालिकेत मराठी भाषेचा वापर आपण पाहिलाय मात्र मराठी मालिकेत प्रथमच हिंदी आणि मराठी भाषांमधले संवाद पाहायला मिळणार आहेत. 

२. पहिल्यांदाच एखाद्या मराठी मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रबाहेर करण्यात आलेय. 

३. या मालिकेचे संपूर्ण शूटिंग वाराणसीतील गंगा घाटावर करण्यात आलेय.

४. दोन संस्कृतीचा मिलाफ या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळतो. 

५. मराठीसोबतच काही हिंदी कलाकारही या मालिकेत काम करत आहेत.