'प्रेम रतन धन पायो' संबंधी १० मजेदार गोष्टी?

 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४० कोटींची कमाई केली. त्या चित्रपटासंबंधी १० मजेशीर गोष्टी आहेत, जाणून घ्या कोणत्या 

Updated: Nov 13, 2015, 06:59 PM IST
'प्रेम रतन धन पायो' संबंधी १० मजेदार गोष्टी?  title=

मुंबई : 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४० कोटींची कमाई केली. त्या चित्रपटासंबंधी १० मजेशीर गोष्टी आहेत, जाणून घ्या कोणत्या 

1) स्वरा भास्कर ही एकमेव अभिनेत्री आहे जीन सलमानच्या बहिणीची भूमिका करण्याची तयारी दाखवली. प्रत्येक अभिनेत्री सलमानसोबत रोमान्स करू इच्छिते. यापूर्वी अमृता राव हिने सलमानची बहिण होण्यास नकार दिला होता. 

२) चाइल्ड अॅक्टर हर्षाली मल्होत्रा ही एक छोट्या रोलमध्ये दिसली आहे. तिच्यावर काही सीन शूट करण्यात आले होते, पण त्याच दरम्यान बजरंगी भाईजानमध्ये तिची निवड झाल्यामुळे हर्षालीच्या आईने या चित्रपटातील छोट्या रोल नकार दिला. 

३) सलमानचा हा १४ वा चित्रपट आहे त्यात त्याने प्रेमची भूमिका निभावली आहे. तर सूरज बडजात्याच्या चित्रपटात त्याने चौथ्यांदा प्रेमची भूमिका साकारली आहे. 

४) सलमानच्या अपोझिट दीपिका पदुकोण, करिना कपूर, सोनाक्षी सिन्हा सारख्या अभिनेत्रींचे नाव होते पण हा रोल सोनमच्या पदरा पडला. 

५) विवाह या चित्रपटानंतर ९ वर्षांनंतर सूरज बडजात्या दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. 

Image result for vidyut jamwal dnaindia६) नील नितिन मुकेश याच्या रोलसाठी पूर्वी विद्युत जमवाल याचे नाव होते. पण तो सपोर्टिंग रोलसाठी तयार नव्हता. त्यामुळे त्याने ही ऑफर नाकारली. 

७) चित्रपटाचे शीर्षक संत मीराचे भजन 'पायो जी मैंने राम रतन धन पायो' पासून प्रेरित होऊन ठेवण्यात आले आहे. जेव्हा सलमानने हे शीर्षक ऐकले तर त्याला आपले हसणे थांबविता येत नव्हते. 

८) हम साथ साथ है च्या १६ वर्षांनंतर सलमान आणि सूरजने एकसाथ काम केले आहे. 

९) या चित्रपटाच्या शुटिंगवेळी सोनम कपूरला राजकोटमध्ये स्वाइन फ्ल्यू झाला होता. त्यानंतर तिला मुंबईत हलविण्यात आले होते. 

१०) या पूर्वी सिनेमाचे शीर्षक 'बडे भैया' ठेवण्यात आले होते. पण सूरजला लांब नाव असलेले चित्रपट आवडतात त्यामुळे त्याचे शीर्षक 'प्रेम रतन धन पायो' ठेवण्यात आले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.