मुंबई : फरहान अख्तर, अमिताभ बच्चन, अदिती राव हैदरी, नील नितिन मुकेश अशी तगडी कास्ट असलेला 'वझीर' आज प्रदर्शित होतोय. यानिमित्तानं हा सिनेमा पाहण्याची दहा उल्लेखनीय कारणं आम्ही देत आहोत.
१. सिनेमाची सुपरकास्ट
फरहान अख्तर आणि अमिताभ बच्चन यांची जुगलबंदी... याशिवाय आणखी काय हवंय... शिवाय, अदिती राव हैदरी, नील नितिन मुकेश यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसंच जॉन अब्राहम आणि मानव कौल हे देखील या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येत आहेत.
२. तिघांची धम्माल
अभिजात जोशी आणि विधु विनोद चोपडा यांची मिलीभगत 'मुन्नाभाई'पासून ते '३ इडियट'पर्यंत आपण सर्वांनीच पाहिलीय. या सिनेमात या दोघांमध्ये आणखी एक व्यक्ती सामील झालीय ती म्हणजे 'शैतान'फेम दिग्दर्शक बिजॉय नाम्बियार... सोबत शांतनु मोइत्रासारखा म्युझिक डायरेक्टर
३. नील नितीन मुकेश
एक निगेटिव्ह इमेजसहीत नील नितीन मुकेशनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. तेव्हा तो चांगला अभिनेता असल्याचं त्यानं सिद्ध करून दाखवलं होतं. प्रेम रतन धन पायोमध्ये त्याला काही फारसा वाव मिळाला नाही. त्यामुळे, वझीर हा सिनेमा त्याच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा असेल.
४. सिनेमाचं संगीत
सिनेमाचं संगीत उत्कृष्ठ असल्याचं म्हणावंच लागेल... कारण जिथं सोनू निगम आणि श्रेया घोषालसारखे गायक आहेत तिथं काय उणीव राहावी... या दोघांचं 'तेरे बिन' हे गाणं अगोदरच वायरल झालंय.
५. अमिताभ - फरहान गायकाच्या भूमिकेत
या सिनेमातलं अगोदरच प्रदर्शित झालेलं 'यारी' हे गाणं हीट ठरलंय. हे गाणं अमिताभ - फरहाननं गायलंय.
६. फरहान - अमिताभची मैत्री
अमिताभ आणि फरहानची मैत्री आणि एकमेकांची जबाबदारी हा सिनेमाचा मुख्य गाभा आहे. या दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
७. खुर्ची
सिनेमात दाखवण्यात आलेली अमिताभ बच्चनची खुर्ची सिलेक्ट करण्यासाठी तब्बल ४३ व्हिलचेअर टेस्ट करण्यात आल्या.... आणि नंतर मग हा लूक फायनल करण्यात आला.
८. भावना - अॅक्शन - सस्पेन्स
सिनेमात जबरदस्त अॅक्शन पाहायला तुम्हाला मिळणार आहे.... शिवाय या सिनेमात एक गंभीर सस्पेन्सही दडलाय. सिनेमाचा ट्रेलर पाहून एव्हाना हे तुमच्या लक्षात आलंच असेल. याशिवाय अमिताभ-फरहानमध्ये एक भावनात्मक बंधही दिसून येतोय.
९. फरहानची अॅक्शन
या सिनेमातून पहिल्यांदाच प्रेक्षक फरहान अख्तरला अॅक्शन सीन्स करताना पाहणार आहेत. यापूर्वी त्याला कॉमेडी, रोमान्स, बायोपिक, इन्टेन्स अशा सगळ्या प्रकारांत प्रेक्षकांनी त्याला पाहिलंय.
१०. नव्या वर्षाचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा
१८ डिसेंबरनंतर प्रेक्षकांना नवा हिंदी सिनेमा मिळालेला नाही. 'वझीर' हा यंदाच्या वर्षातला बॉलिवूडचा पहिला सिनेमा प्रेक्षकांसमोर येतोय. प्रेक्षक नक्कीच या संधीचा लाभ घ्यायला आसुसलेले आहेत.