याकूबने का लिहलं नाही मृत्युपत्र?

याकूबला गुरूवारी फाशी होणार आहे, तरी त्याने अद्याप मृत्युपत्र लिहलेलं नाही, प्रत्येक फाशीचा कैदी आपलं मृत्युपत्र लिहून देत असतो, त्याच्या जवळील ऐवज किंवा संपत्तीचे वारस तो यात लिहित असतो.

Updated: Jul 29, 2015, 08:33 PM IST
याकूबने का लिहलं नाही मृत्युपत्र? title=

मुंबई : याकूबला गुरूवारी फाशी होणार आहे, तरी त्याने अद्याप मृत्युपत्र लिहलेलं नाही, प्रत्येक फाशीचा कैदी आपलं मृत्युपत्र लिहून देत असतो, त्याच्या जवळील ऐवज किंवा संपत्तीचे वारस तो यात लिहित असतो.

मात्र सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींकडे दयेच्या अर्जाद्वारे याकूब आशादायी होता. त्यामुळे आपल्याला फाशी होणार नाही असं याकूबला वाटत होतं. त्यामुळेच त्याने आपले मृत्युपत्र लिहिले नाही‘ अशी प्रतिक्रिया याकूबच्या वकिलांनी दिली आहे.

मुंबई 1993 स्फोटातील आरोपी याकूब मेननला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो सध्या नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात आहे. दरम्यान त्याच्या फाशीवर विचार करण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 

याकूबच्या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्व कायदेशीर बाबी पाळण्यात आल्याने त्याच्या क्‍युरेटिव्ह पिटीशनवर पुन्हा सुनावणी होणार नाही. 

याकूबला बजावण्यात आलेलं डेथ वॉरंट हे कायदेशीर आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हणत पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. तसेच राष्ट्रपती आणि राज्यपालांनीही दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे गुरुवारी त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.