www.24taas.com, झी मीडिया, लंडन
रविवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचाराची धुरा संभाळण्यास दिली गेली. या गोष्टीमुळे केवळ काँग्रेस व इतर भारतीय राजकीय पक्षांमध्येच नव्हे, तर जगभरातील राजकीय विश्लेषकांमध्ये खळबळ उडाली आहे.
भाजपचे वादग्रस्त नेते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे आता दावेदार ठरत असल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं आहे.
जगभरातील वृत्तपत्रांमध्ये या गोष्टीवर चर्चा सुरू झाली आहे. ब्रिटनचं मुख्य वर्तमानपत्र ‘द इंडिपेंडंट’ मधील लेखामध्ये या गोष्टीची दखल घेत म्हटलं आहे, की समाजात आपलं स्थान अधिकाधिक बळकट करत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या आणखी जवळ पोहोचले आहेत. आता त्यांना राहुल गांधींशी सामना करावा लागेल.
भाजपने जरी अधिकृतरीत्या पंतप्रधानपदासाठी आपला उमेदवार घोषित केला नसला, तरी भाजपच्या निवडणूक प्रचाराचं अध्यक्षपदमोदींकडे सोपवून त्यांच्याविरोधातील बहुतेक आव्हानं संपुष्टात आणली आहेत, असंही ब्रिटनमधील वर्तमानपत्राने लिहिलं आहे. त्यामुळे जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तर त्यांना व्हिसा नाकारणाऱ्या अमेरिकेपुढे मोठाच पेच उभा राहाणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.