केवळ 17 मिनिटांत महिलेनं दिला 11 मुलांना जन्म

इंडियानामध्ये एका महिलेनं एक, दोन नाही तर तब्बल 11 मुलांना एकाच वेळी जन्म दिलाय. 

Updated: Jun 30, 2016, 09:11 PM IST
केवळ 17 मिनिटांत महिलेनं दिला 11 मुलांना जन्म title=

इंडियानापोलीस : इंडियानामध्ये एका महिलेनं एक, दोन नाही तर तब्बल 11 मुलांना एकाच वेळी जन्म दिलाय, ही बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली दिसतेय.  

मारिया हर्नानडेस असं या महिलेचं नाव आहे. ती 42 वर्षांची आहे. 42 वर्षांच्या या महिलेनं 11 मुलांना जन्म देणं ही घटना एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. 

मारियाला हॉस्पीटलमध्ये आणलं गेलं तेव्हा अनेक लोक हैराण होते. केवळ 17 मिनिटांत या महिलेनं तब्बल 11 मुलांना जन्म दिला... त्यानंतर डॉक्टरांनीही मोकळा श्वास घेतला. 

उल्लेखनीय म्हणजे, मारिया आणि तिच्या 11 मुलींची तब्येत चांगली आहे. डॉक्टरांसाठीही ही घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.