लॉस एंजिल्स : २६ वर्षांच्या भारतीय महिलेवर मेंदूत वाढलेल्या ट्यूमरची शस्त्रक्रिया चालू असताना , तिच्या मेंदूत पूर्ण वाढ झालेला जुळे गर्भ मिळाला असून, डॉक्टरही चकित झाले आहेत. या गर्भांची हाडे विकसित असून, दात आणि केसही आलेले आहेत.
यामिनी करनम असं या महिलेचं नाव असून, २६ वर्षांची ही युवती इंडियाना विद्यापीठातील पीएच.डी.ची विद्यार्थिनी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिला वाचताना आणि बोलताना त्रास होऊ लागला. मूळ हैदराबादची असणाऱ्या करनमला डोकेदुखी इतकी तीव्र होती, की तिला खाणंही जमत नसे. करनमची तपासणी झाली तेव्हा तिच्या मेंदूतील पिनियल ग्लँड (मध्य मेंदूतील वाटाण्याच्या आकाराचा अवयव) वर ट्यूमर वाढला असं निदान करण्यात आलं.
टेराटोमा अतिशय दुर्लभ
एका परदेशी वृत्तवाहिनीनुसार इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या यामिनीला याची कल्पनाही नव्हती की तिच्या मेंदूमध्ये काय होतंय. जेव्हा शस्त्रक्रिया झाली तेव्हा हे कळलं. ऑपरेशननंतर यामिनीनं आपल्या मेंदूमध्ये टेराटोमा (जूळं गर्भ) बद्दल ऐकूण स्तब्ध झआली. टेराटोमा आधुनिक वैद्यकीय शास्त्रात दुर्लभ आहे. या गर्भांची हाडे विकसित असून, दात आणि केसही आलेले आहेत.
यामिनीवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर हरायर शाहिनियन यांनी सांगितलं की, मी दुसऱ्यांदा टेराटोमा काढलाय तो ही एकाच मेंदूतून... यापूर्वी मी ७ ते ८ हजार मेंदूंच्या ट्युमरचे ऑपरेशन केलंय. अत्याधुनिक पद्धतीनं फायबर ऑप्टिक पद्धतीनं ही शस्त्रक्रिया केली गेली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.