लंडन : ब्रिटनच्या एका महिलेने ३.३ कोटी पौंडांची म्हणजेच ३१८ कोटी बक्षीसाचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. ही लॉटरी तिने जिंकली असा दावा तिने केलाय. पण, चुकून त्या लॉटरीचं तिकीट मात्र वॉशिंग मशीनमध्ये तिच्या कपड्यांसोबत धुतलं गेलं आहे.
ही बाब लक्षात आल्यावर या महिलेने तिकीट सुकवण्याचा प्रयत्न केला खरा. पण, या तिकीटावरील तारीख मात्र पाण्यामुळे धुतली गेली आहे.
या महिलेने एका भारतीय वंशाच्या नागरिकाच्या दुकानातून हे तिकीट खरेदी केलं होतं. पण, त्या दुकानदाराच्या मते त्याने तिकीट पाहिलं तेव्हा ते अत्यंत जीर्ण अवस्थेत होतं.
आता त्या महिलेला ३० दिवसांत तिकीट जमा करण्यास सांगण्यात आले आहे. पुढील १८० दिवसांत जर कोणी या बक्षिसावर दावा केला नाही, तर या महिलेस ही रक्कम मिळू शकते. नाहीतर एखाद्या सेवाभावी संस्थेला ती दान केली जाऊ शकते.