या बटाट्याच्या फोटोची किंमत आहे तब्बल १० लाख रुपये

जर तुम्हाला वाटत असेल की केवळ सोने, हिरे, मोती या सर्वात किंमती आणि महागड्या वस्तू आहेत तर असं नाहीये. 

Updated: Jan 25, 2016, 12:50 PM IST
या बटाट्याच्या फोटोची किंमत आहे तब्बल १० लाख रुपये title=

नवी दिल्ली : जर तुम्हाला वाटत असेल की केवळ सोने, हिरे, मोती या सर्वात किंमती आणि महागड्या वस्तू आहेत तर असं नाहीये. जगात अशा अनेक वस्तू आहेत ज्यांच्या किंमती इतक्या महागड्या असतील याचा विचारही केला नसेल. 

एका बटाट्याची किंमत साधारण किती रुपये असू शकते? १० रुपये? २० रुपये? जास्तीत जास्त ५० रुपये? पण नाही या बटाट्याच्या फोटोची किंमत हिरे-जवाहरपेक्षाही अधिक आहे. 

एका इंग्रजी वेबसाईटनुसार या बटाट्याचा फोटो तब्बल १० लाख डॉलर म्हणजेच ६.७६ कोटी रुपयांना विकण्यात आलाय. 

हा फोटो प्रोफेशनल फोटोग्राफर केविन अबोस्क यांनी काढलाय. केविन याना बटाटा अधिक आवडतो. त्यामुळे त्यांनी विविध बटाट्यांचे फोटो काढलेत. त्यातील हा बटाट्याचा फोटो त्यांचा आवडता आहे.