शिक्षिकेने इंटरनेटवर टाकले विद्यार्थ्यांचे न्यूड फोटो

 चीनमध्ये नर्सरी स्कूलच्या एका शिक्षिकेने २० पेक्षा अधिक लहान मुलांचे न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहे. या महोदया इतक्यावर थांबल्या नाहीत त्यांनी याला लैंगिक शिक्षणाचा एक भागही म्हटले आहे. शिक्षिकेच्या या कृतीमुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. 

Updated: Oct 21, 2015, 06:24 PM IST
शिक्षिकेने इंटरनेटवर टाकले विद्यार्थ्यांचे न्यूड फोटो title=

पेइचिंग :  चीनमध्ये नर्सरी स्कूलच्या एका शिक्षिकेने २० पेक्षा अधिक लहान मुलांचे न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहे. या महोदया इतक्यावर थांबल्या नाहीत त्यांनी याला लैंगिक शिक्षणाचा एक भागही म्हटले आहे. शिक्षिकेच्या या कृतीमुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. 

ही धक्कादायक घटना चीनच्या हेनान प्रांतात झाली आहे. लहान मुलांचे फोटो जुलै महिन्यात काढण्यात आले होते आणि त्यांना सोशल मीडियावर अपलोड केले होते. 

शिक्षिकेचे म्हणणे आहे की चांगल्या कामासाठी मी फोटो सोशल मीडियावर टाकले असल्याची बातमी चायनान्यूज.डॉट.कॉमने दिली आहे. 

मुलांना लैंगिक शिक्षण देत होती. आपल्या हा कृतीला योग्य ठरवत शिक्षा म्हणाली, तिच्या या शिक्षणाचा मुलांना भविष्यात फायदा होईल. शिक्षिकेने असे करताना मुलांच्या आई-वडिलांची परवानगी घेतली नव्हती त्यामुळे आता शिक्षिका अडचणीत आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.