दक्षिण आफ्रिकेत गुहेमध्ये सापडलेत प्राचीन मानवी अवशेष

दक्षिण आफ्रिकेतील एका गुहेमध्ये मानवाच्या हाडाचे सापळे आणि दातांचे अवशेष सापडले आहेत. मात्र, हे अवशेष प्राण्याचे आहेत की मानवाचे याबाबत मतभिन्नता दिसून येत आहे. जोपर्यंत याचे अधिक संशोधन होत नाही तोपर्यंत मानवी उत्क्रांतीबाबत काहीही बोलता येणार नाही, असे संशोधकांनी म्हटलेय.

Reuters | Updated: Sep 11, 2015, 10:11 AM IST
दक्षिण आफ्रिकेत गुहेमध्ये सापडलेत प्राचीन मानवी अवशेष title=

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील एका गुहेमध्ये मानवाच्या हाडाचे सापळे आणि दातांचे अवशेष सापडले आहेत. मात्र, हे अवशेष प्राण्याचे आहेत की मानवाचे याबाबत मतभिन्नता दिसून येत आहे. जोपर्यंत याचे अधिक संशोधन होत नाही तोपर्यंत मानवी उत्क्रांतीबाबत काहीही बोलता येणार नाही, असे संशोधकांनी म्हटलेय.

गुहेमध्ये सापडलेले अवशेष हे प्राचीन मानवीच असल्याचे दावा संशोधकांनी केलाय. मानवी चेहऱ्याशी किंचित मिळतेजुळते हे अवशेष आहेत. तर काहींनी प्राण्याचे असल्याचे म्हटलेय. संशोधकांनी या प्राण्याला सध्या ‘नाह लेह डी’ असे नाव दिलेय.

जोहान्सबर्गपासून तीस मैल अंतरावर ही गुहा आहे. याच गुहेत संशोधकांना हाडाचे सापळे आणि दातांचे अवशेष सापडलेत. १५ संशोधकांना मानवी हाडांचे व इतर अवयवांचे १,५५० नमुने सापडले आहेत, तसा त्यांनी दावा केलाय.

पाहा व्हिडिओ :

जोहान्सबर्ग विद्यापीठाचे प्राध्यापक आणि या संशोधन पथकातील प्रमुख ली बर्गर यांनी सांगितले, हाडांच्या सापळ्यावरून असे दिसते की, याचे वय लाखो वर्षांपूर्वीचे आहे. मात्र, याचे निश्चित निष्कर्ष काढणे कठीण आहे.

सापडलेल्या अवशेषांवर आणखी संशोधन सुरू आहे. संशोधकांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत या प्राचीन अवशेषांबाबत अधिकृत घोषणा केली, तर शोधपत्रिका ई-लाईफमध्येही नव्या संशोधनावर भाष्य करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

गुहेच्या दुर्गम भागात हा प्राणी कसा गेला यावरही तर्कवितर्क मांडले जात आहेत. मृत्यूनंतर या प्राण्याचे अवशेष येथे ठेवले गेले असल्याचे मत काहींनी व्यक्त केलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.