पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सात ठिकाणी दहशतवादी हल्या करण्यात आला. या हल्ल्यात १५८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार करण्यात यश मिळवले.
अधिक वाचा : पॅरिस अतिरेकी हल्ला : सोशल मीडियावर 'इसिस'चा जल्लोष
दुसऱ्या महायुद्धानंतर हा फ्रान्समधील सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. पॅरिसमधील फूटबॉल स्टेडिअमजवळ ३ स्फोट घडवून आणण्यात आले. यावेळी सामना सुरु होता. स्फोटानंतर सामना थांबविण्यात आला. या हल्ल्यानंतर फ्रान्स सरकारने देशाच्या सीमा बंद केल्या आणि देशात आणीबाणी लागू केली.
अधिक वाचा : पॅरिस अतिरेकी हल्ला : फ्रान्समध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा
फ्रान्सचे पोलीस दल आणि दहशतवाद्यांमध्ये काही तास सुरू असलेल्या चकमकीत सर्व ८ दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे फ्रान्सच्या तपास यंत्रणेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
अधिक वाचा : फ्रान्समध्ये मोठा अतिरेकी हल्ला, 158 ठार
पाहा व्हिडिओ :
फूटबॉल स्टेडिअमजवळ ३ स्फोट, सामना रद्द
पॅरिसमधील हल्ल्यानंतर
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.