नवी दिल्ली : आपल्या आजीला आदरांजली वाहण्यासाठी एका कलाकारानं चक्क 'स्वर्गाची शिडी'च बनवून सगळ्या जगाला तोंडात बोटं घालायला लावली.
डेली मेलनं दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील कुआनझोऊ प्रांतात राहणाऱ्या ग्योक्यांग या कलाकारानं मोठी आतिषबाजी करत आकाशात तब्बल 500 मीटर उंचीची शि़डी बनवली. या आतिषबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय.
मेटल आणि अॅल्युमिनअमनं बनलेल्या तारांना गनपावडरच्या मदतीनं एका एअर बलूनला जोडून ही शिडी बनवण्यात आली होती. हा बलूनही खास पद्धतीनं बनवण्यात आला होता.
जवळच्याच एका आयलँडवर नौकेतून हा बलून लॉन्च केला गेला. ही स्वर्गात जाणारी शिडी आकाशात केवळ 80 सेकंदांसाठीच दिसली. पण, ती बनवण्यासाठी मात्र 21 वर्ष लागलेत.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.