२३ जणांची हत्या करून शवाचे लचके तोडणाऱ्या नरभक्षी महिलेला अटक

रशियाच्या एका महिलेवर तब्बल २३ लोकांची क्रूरतेनं हत्या करून त्यांच्या मृत शरीरावर ताव मारण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. 

Updated: Aug 12, 2015, 04:55 PM IST
२३ जणांची हत्या करून शवाचे लचके तोडणाऱ्या नरभक्षी महिलेला अटक title=
सौ. डेलीमेल

लंडन : रशियाच्या एका महिलेवर तब्बल २३ लोकांची क्रूरतेनं हत्या करून त्यांच्या मृत शरीरावर ताव मारण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. 

६८ वर्षीय तमारा समसोनोवा हिला पोलिसांनी गेल्या महिन्यात एका खूनाच्या आरोपाखाली अटक केली होती. जुलै महिन्यात सीसीटीव्ही फुटेजमध्ये समसोनोवा ही एका ७९ वर्षीय महिलेचं शव गोणपाटात बांधून घेऊन जाताना दिसली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. यानंतर त्यांच्यासमोर जे धक्कादायक खुलासे झाले त्यामुळे सगळं जगच अवाक पडलंय. 

तमारा हिच्यावर अन्य १३ लोकांच्या हत्येचाही आरोप ठेवण्यात आलाय. या लोकांची हत्या करून त्यांचे शव नरभक्षी तमारानं खाल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. कारण या शवांचे तुकडे-तुकडे ओरबाडल्याच्या अवस्थेत ते आढळून आले होते. 

तमाराची डायरी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर काही खुलासे झाले. या डायरीच्या नोंदीनुसार तिनं आणखी १० लोकांचीही हत्या केली होती. सेंट पिटर्सबर्गला राहणाऱ्या एका व्यक्तीनंही महिलेवर आणखी १० हत्येचा आरोप लावलाय. पोलीस या हत्येचीही चौकशी करत आहेत. समसोनोवानं १३ हत्यांची कबुलीही दिलीय. 

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, महिलेनं गेल्या आठवड्यात न्यायालयात ११ हत्यांची सुनावणी सुरू असताना आपण दोषी असल्याचं स्वीकार केलंय. आपल्याला याबद्दल शिक्षाही मिळायला हवी, असंही तीनं यावेळी म्हटलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.