न्यूयॉर्क : इबोला विरोधात मोहिमेसाठी मदत म्हणून, ३ हजार सैनिकांना लायबेरियाला पाठवलं जातील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा मंगळवारी करणार आहेत.
असं म्हटलं जातंय की, अमेरिकन लष्कराने आफ्रिकी देशात इबोलाच्या रूग्णांच्या मदतीसाठी नवं केंद्र स्थापन करण्याची योजना आखली आहे, या योजनेवर देखरेख अमेरिकन लष्कर देखरेख करणार आहे.
तसेच लायबेरियातील काही निवडणक आरोग्य कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिलं जाणार आहे. इबोला सारख्या रोगाने महाभयंकर रूप धारण केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे
मदतीची गरज आहे
सोमावारी घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रमानी यांनी म्हटलंय, इबोलाचा प्रसार रोखण्यासाठी बाहेरून मोठ्या मदतीची गरज आहे. पश्चिम आफ्रिकी देशांने प्रतिबंध जरा सैल करावेत अशी मागणी केली आहे. या प्रतिबंधांमुळे इबोला विरोधातील मोहिम कमकुवत झाली असल्याचं म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.