'हाफिज सईद मोकळा आहे कारण तो पाकिस्तानचा नागरिक आहे '

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी हाफिज सईदला क्लीन चीट दिल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधलाय.

Updated: Sep 16, 2014, 12:40 PM IST
'हाफिज सईद मोकळा आहे कारण तो पाकिस्तानचा नागरिक आहे ' title=

नवी दिल्ली : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी हाफिज सईदला क्लीन चीट दिल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधलाय.

हाफिज सईदविरुद्ध कोणताही खटला दाखल नाही आणि त्यामुळे तो कुठेही जाण्यासाठी स्वतंत्र आहे, असं म्हणत पाकिस्तानननं हाफिज सईदल पोटाशी धरलंय. यावर, परदेश मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद कबरुद्दीन यांनी पाकिस्तानवर हल्ला चढवलाय.

‘दहशतवादी संघटना जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्याविरुद्ध आमचे विचार स्पाष्ट आहेत. तो २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि मोस्ट वॉन्टेड आरोपी हे आणि मुंबईच्या रस्त्यांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या आरोपात तो भारतीय न्यायालयांत आरोपी आहे. तो पकडला जायलाच हवा आणि त्याच्यावर न्यायिक प्रक्रिया पार पडायला हवी, हे आम्ही वारंवार हे पाकिस्तानला सांगितलंय’ असं कबरुद्दीन यांनी म्हटलंय. ‘त्याला कधीही २६/११ च्या हल्ल्यासाठी अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे तो केवळ यासाठी स्वतंत्र आहे कारण तो एक पाकिस्तानी नागरिक आहे...' असंही त्यांनी म्हटलंय.

हाफिज सईद एक पाकिस्तानी स्वतंत्र नागरिक आहे त्यामुळे तो मोकळेपणानं फिरतोय.... यात कोणताच प्रश्नच नाहीय... राहिला प्रश्न पाकिस्तानचा तर तो एक स्वतंत्र नागरिक आहे त्यामुळे हा आमच्यासाठी प्रश्नच नाही. न्यायालयानं त्याला आधीच सोडून दिलंय. त्याच्याविरुद्ध कोणताही खटला प्रलंबित नाही’’ असं स्पष्टीकरण पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दिलं होतं. त्यानंतर भारतानं ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

या दहशतवादी हल्ल्यांची योजना पाकिस्तानात बनवण्यात आली... या कृत्यासाठी पैशांचा पुरवठाही पाकिस्तानमधून करण्यात आला... आणि यामध्ये अनेक पाकिस्तानी नागरिकांचा समावेश होता... त्यामुळे याचे ९९ टक्के पुरावे पाकिस्तानातच आहेत. यामुळेच, आमचं दीर्घकाळापासून म्हणणं आहे की हाफिज सईदसारख्या आरोपींवरुद्ध कारवाई करणं पाकिस्तानची जबाबदारी आहे, असं कबरुद्दीन यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.