काबुल : सीरियानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवरही हल्ला केलाय. दहशतवादी संघटना आयएसआयएसचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेनं अण्वस्र विरहित बॉम्बहल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ अमेरिकच्या यूएस सेन्ट्रल कमांडनं जाहिर केला आहे.
आत्तापर्यंत करण्यात आलेल्या हल्ल्यांमधला हा सर्वात शक्तिशाली हल्ला असल्याचं सांगण्यात येतंय. या हल्ल्यामध्ये ३६ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पहिल्यांदाच अमेरिकेनं हल्ला करताना 'जीबीयू-४३' या बॉम्बचा वापर केलाय. तब्बल 21,000 पौंड वजन असल्याचा हा बॉम्ब असल्याचं समजतंय.
#WATCH: Aerial footage of US unleashing non-nuclear bomb MOAB against ISIS targets in Afghanistan. (Source: US Central Command) pic.twitter.com/AOu31c344n
— ANI (@ANI_news) April 14, 2017