बीजिंग : उत्तर कोरियामुळे कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकते, असा इशारा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी दिला आहे. तसेच अमेरिकेशी वाढता तणावामुळे इशारा दिला का युद्धमुळे कोणाचा विजय होत नाही. तसेच कोणाचे भले होत नाही.
उत्तर कोरियाची समस्येचा उपाय काढला जाईल या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यानंतर चीनकडून हे टोकाच वक्तव्य करण्यात आले.
वांग यांनी म्हटले की, एकीकडे अमेरिका आणि दक्षिण कोरिया आणि दुसरीकडे उत्तर कोरिया अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तणाव वाढला आहे. असे वाटते आहे की कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकते.
फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्यां मार्क अरॉल्ट यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, जर युद्ध झाले तर याचा परिणा म्हणजे सर्वांचे नुकसान होईल. कोणीही विजेता होणार नाही.
वांग म्हणाले, जो पण देश लढाई छेडेल त्याने ऐतिहासिक जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्याची परतफेड करावी लागेल.
व्हाईट हाऊस आणि परराष्ट्र धोरणाचे एक सल्लागाराने शुक्रवारी म्हटले की, उत्तर कोरियाचे शस्त्रास्त्र कार्यक्रमाच्या उत्तरादाखल अमेरिकेने लष्करी तैनाती केली आहे.