#हिमालयालाहादरे: नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर कोसळलं

 नेपाळमध्ये ७.९ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आलीय. या भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान झालंय. कुतुबमिनार सारखं नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर भूकंपामुळं कोसळलंय. यावेळी टॉवर बघण्यासाठी आलेले पर्यटक अडकल्याची भीती आहे.

Updated: Apr 25, 2015, 02:53 PM IST
#हिमालयालाहादरे: नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर कोसळलं title=

काठमांडू :  नेपाळमध्ये ७.९ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आलीय. या भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान झालंय. कुतुबमिनार सारखं नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर भूकंपामुळं कोसळलंय. यावेळी टॉवर बघण्यासाठी आलेले पर्यटक अडकल्याची भीती आहे.

नेपाळी वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार धरहरा टॉवरमध्ये जवळपास ४०० पर्यटक अडकल्याचं सांगण्यात येतंय. आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झालाय. अनेक ठिकाणी घरं कोसळली आहेत, रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळं काठमांडूचं चित्र या भूकंपानंतर बदलून गेलं आहे. 

सोशलमीडियावर सध्या नेपाळमधल्या परिस्थितीचे शेकडो फोटो येऊन तिथली परिस्थिती सांगत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.