दुबई जळत होतं... आणि ते सेल्फी काढत होते!

दोन दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुबईच्या एका हॉटेलमध्ये लागलेली आग तुम्हीही पाहिली असेल... याच घटनेशी संबंधित एक जोडपं सध्या सोशल वेबसाईटवर टीकेचं धनी ठरतंय.

Updated: Jan 2, 2016, 01:38 PM IST
दुबई जळत होतं... आणि ते सेल्फी काढत होते! title=

मुंबई : दोन दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुबईच्या एका हॉटेलमध्ये लागलेली आग तुम्हीही पाहिली असेल... याच घटनेशी संबंधित एक जोडपं सध्या सोशल वेबसाईटवर टीकेचं धनी ठरतंय.

दुबईतल्या एका ६३ मजल्यांच्या इमारतीनं घेतलेला पेट भयंकर होता. ही आग पाहून अनेकांना भीती वाटली असेल किंवा आपल्या नातेवाईकांची काळजी वाटली असेल.... पण, याच वेळी एक जोडपं मात्र या जळत्या इमारतीसमोर 'सेल्फी' काढण्यात गुंग होतं. 

या जोडप्याची असंवेदनशीलता आता सोशल वेबसाईटवर चर्चेचा विषय ठरलीय... नेटिझन्सनं त्यांना चांगलंच फैलावर घेतलंय.