टॉपलेस महिलांकडून मुस्लिम कॉन्फ्रन्समध्ये निदर्शनं

दोन टॉपलेस महिला कार्यकर्त्यांनी पेरिसमध्ये सुरू असलेल्या मुस्लिम कॉन्फ्रन्समध्ये शिरून, ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला, सोशल मीडियावर या दोनही महिलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Updated: Sep 14, 2015, 01:36 PM IST
टॉपलेस महिलांकडून मुस्लिम कॉन्फ्रन्समध्ये निदर्शनं title=

पेरिस : दोन टॉपलेस महिला कार्यकर्त्यांनी पेरिसमध्ये सुरू असलेल्या मुस्लिम कॉन्फ्रन्समध्ये शिरून, ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला, सोशल मीडियावर या दोनही महिलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओत दिसतंय की, मंचावर दोन इमाम सभेला संबोधित करत आहे, त्याच वेळी मध्ये उड्या मारून या महिला स्टेजवर आल्या, यानंतर दोन्ही इमाम लगेच स्टेज सोडून निघून गेले.

या महिला जोरजोराने घोषणा देत होत्या, तेव्हा सुरक्षाकर्मचारी आणि आयोजनकर्त्यांनी त्यांना मंचपासून दूर केलं.

एका महिलेला मारहाण
व्हिडीओत महिलेला बाजूला करतांना ती स्टेजवर ती खाली पडलीय काही लोकांनी मिळून तिला मारहाण केली आहे. 

विरोध करणाऱ्या एका महिलेच्या वक्षावर लिहलं होतं, 'नोबडी मेक्स मी सब्मिट', या महिला फेमिन नावाच्या संघटनेच्या आहेत. ही संघटना २००८ मध्ये यूक्रेनमध्ये बनवण्यात आलं होतं. पेरिसमधूनच ही संघटना चालवली जाते. ही संघटना महिलांवरील अत्याचार, धार्मिक कट्टरता या मुद्दयांवर यापूर्वीही टॉपलेस प्रदर्शन करत आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.