इस्लामाबाद : पत्रकार वुसतुल्लाह ख़ान यांनी बीबीसीच्या वेबसाईटवर एक बातमी दिली आहे, त्यात त्यांनी पाकिस्तानातील हिंदू-मुस्लिमांचं नातं कसं आहे, यावर प्रकाश टाकला आहे. यात त्यांनी हिंदू-मुस्लिम एकमेकांच्या सणांचा कसा आदर करतात यावर लिहलं आहे.
बनिया-व्यापारी सुखी समाधानी
पाकिस्तानात हिंदूमध्ये बनिया-व्यापारी, डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत, हा हिंदूचा वरचा क्लास समजला जातो. अल्पसंख्याक हिंदू तेथे राजकारणाचा चेहरा देखील आहेत. मात्र त्यांचे मतदार जास्तच जास्त शेड्यूल्ड कास्टमधून आहेत, मेघवाड, भील, कोळी आदिवासी अशा जाती हिंदूंमध्ये आहेत, त्याचं राहणं, खाणं राजस्थानी लोकांसारखं आहे.
पाकिस्तानातील सिंध आणि पंजाब या भागांमध्ये यापूर्वी भेदाभेदचं वातावरण होतं, आता हे प्रमाण अत्यल्प दिसून येतं.
मंदिर-मशीद येथे पाठिला पाठ लावून
थरपाकर जिल्ह्यात मिठीशहरमध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे, शहरातील बाहेरील गावात मुसलमान शेतकरी आणि मजुरांची संख्या जास्त आहे, उमरकोटमध्येही हीच परिस्थिती आहे.
काही ठिकाणी हिंदू-मुस्लिम यांचं एकाच कब्रस्तानात दफन आणि अंतिम विधीही होतात. मंदिर-मशीद येथे पाठिला पाठ लावून उभे आहेत, मंदिर आणि मशीदीत कोण आला, कोण गेला, राहून गेला, थोडी झोप काढून गेला, कुणीही काहीही विचारत नाही.
बकरी ईदच्या वेळेस गाय आणि बैलाची कुर्बानी देत नाहीत
पाकिस्तानात गाय आणि बैल यांचं मास खाल्ल जातं, पण तरीही उमरकोट आणि थरपारकरमध्ये मुसलमान बकरी ईदच्या वेळेस गाय आणि बैलाची कुर्बानी देत नाहीत. तसेच लग्न तसेच इतर समारंभात ते आपल्या हिंदू मित्रांना त्या भांड्यांमध्ये जेवण वाढत नाहीत, ज्यात बीफ यापूर्वी त्यांनी खाल्लंय.
हिंदू देखील आपल्या उत्सवात आणि लग्नात वेगवेगळे पदार्थ बनवतात, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण ते वेगळ्या बाजूला ठेवतात, ज्याला जे खायचं असतं, ते जेवण ते खाऊ शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.