या वेटरला मिळाली तब्बल ६६ हजारांची टीप

हॉटेलमध्ये जेवण करुन झाल्यानंतर तेथील वेटरला टीप दिली जाते. १० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतही टीप काहीजण देतात. मात्र उत्तर कॅरोलिनामधील ऑलिव्ह गार्डनमधील एका वेटरला तब्बल ६६ हजार रुपयांची टीप देण्यात आलीय.

Updated: Dec 28, 2015, 12:22 PM IST
या वेटरला मिळाली तब्बल ६६ हजारांची टीप title=

कॅरोलिना : हॉटेलमध्ये जेवण करुन झाल्यानंतर तेथील वेटरला टीप दिली जाते. १० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतही टीप काहीजण देतात. मात्र उत्तर कॅरोलिनामधील ऑलिव्ह गार्डनमधील एका वेटरला तब्बल ६६ हजार रुपयांची टीप देण्यात आलीय.

कॅथरीन आर्यविन असे या २४ वर्षीय वेटरचे नाव आहे. ती गेल्या तीन वर्षांपासून या हॉटेलात काम करतेय. गेल्या रविवारी हॉटेलमध्ये एक कुटुंब जेवण्यास आले होते. त्यांचे जेवणाचे बिल ७५ डॉलर इतके झाले. बिलासोबत त्यांनी अतिरिक्त एक हजार डॉलर इतकी रक्कम टेबलावर ठेवली आणि ते निघून गेले. 

कामामध्ये व्यस्त असल्याकारणाने आर्यविनने त्यांनी ठेवलेली रक्कम पाहिली नाही. ते कुटुंब तेथून निघून गेल्यावर बिल पेड कऱण्यासाठी तिने ते पैसे उचलले मात्र तेथे केवळ ७५ डॉलरच नव्हते तर एक हजार डॉलर अधिक ठेवण्यात आले होते. तिने पुन्हा पुन्हा बिलाची पडताळणी केली. मात्र बिल केवळ ७५ डॉलर इतकेच होते. 

त्या कुटुंबाने या बिलासोबत एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती. त्यात तिच्यासाठी हे पैसे ठेवण्यात आले असून गॉड ब्लेस यू असे म्हटले होते.