विद्यार्थ्याशी संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला सहा वर्षांची कैद

अमेरिकेच्या विनकोंसिन प्रांतातील एका न्यायालयाने १६ वर्षीय विद्यार्थ्यांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोपाखाली एका शिक्षिकेला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा तसेच एक लाख वीस हजार डॉलर दंड ठोठावलाय. नोवाक असे या आरोपी शिक्षिकेचे नाव आहे. 

Updated: Dec 28, 2015, 11:38 AM IST
विद्यार्थ्याशी संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला सहा वर्षांची कैद title=

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या विनकोंसिन प्रांतातील एका न्यायालयाने १६ वर्षीय विद्यार्थ्यांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोपाखाली एका शिक्षिकेला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा तसेच एक लाख वीस हजार डॉलर दंड ठोठावलाय. नोवाक असे या आरोपी शिक्षिकेचे नाव आहे. 

डेलीस्टारडॉटकोडॉटयूकेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिकेने आपला गुन्हा कबूल केलाय. मात्र हे संबंध दोघांच्या संमतीने ठेवल्यात आल्याचे तिने यावेळी सांगितले. तसेच तिने शिक्षा कमी कऱण्याबाबत दाखल केलेली याचिका यावेळी फेटाळून लावली. 

दरम्यान, याप्रकरणाची माहिती विद्यार्थ्यानेही अन्य शिक्षकांना दिली नव्हती. ११ डिसेंबर रोजी दुसऱ्या शिक्षिकेने नोवाक आणि विद्यार्थ्याला क्लासमध्ये चुंबन घेताना पाहिले. त्यानंतर या प्रकऱणाचा खुलासा झाला.